मित्राची वापरण्यासाठी घेतलेली दुचाकी घरासमोरून चोरी
अमळनेर (प्रतिनिधी) मित्राची वापरण्यासाठी घेतलेली दुचाकी घरासमोरून चोरट्याने चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील मांडळ येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांना दिलेली अधिक माहिती अशी की, अक्षय अशोक शिरसाठ (रा. मांडळ) हा फोटोग्राफीचा व्यवसाय करत असल्याने त्याने त्यांचा मित्र बादल सुरेश थोरात (रा. मूडी प्र. डा.) याची ६० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर गाडी (क्र. एमएच १९ इएन ९९४२) प्रवास करण्यासाठी मागून घेतली होती. ३० जुलै रोजी रात्री १० वाजता त्यांनी दुचाकी घरासमोर अंगणात लावली. ३१ रोजी सकाळी पाच वाजता त्याला दुचाकी अंगणात दिसून आली नाही. त्यामुळे त्याने गाडी मालक बादल थोरात याला कळवून परिसरात शोध घेतला. मात्र दुचाकीचा कोणताच शोध न लागल्याने मारवड पोलिसांत दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.