ग्रामदैवत सतीमाता मंदिरावर शुक्रवारी होणार महाभंडारा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुर्हे बु ग्रामदैवत सतीमाता मंदिरावर महाभंडाऱ्याचे दि. १ ऑगस्ट रोजी मंदिर परिसरात करण्यात आले आहे.
दरवर्षी मंदिर संस्थान व कुर्हे बु ग्रामस्थांतर्फे हा महाभंडारा आयोजित केला जोत. हजारो भाविक याचा लाभ घेत असतात, याठिकाणी सेवा देण्यासाठी शेकडो भाविक भक्त परिश्रम घेत असतात. यावर्षी देखील उत्कृष्ठ नियोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी महाप्रसादाचा सहपरिवार लाभ घ्यावा, असे आवाहन सती माता सेवाभावी संस्था, कुर्हे बु.,सती माता युवा फाऊंडेशन, व सर्व ग्रामस्थ, कुर्हे बु.आणि कुर्हे खुर्द यांनी केले आहे.