दिव्यांग बांधवाच्या मागण्यांसाठी आज महविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडी अमळनेरतर्फे दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आज दि. ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहेत.
आंदोलन माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या वेळी जेष्ठ नेते मनोहर पाटील, अॅड, ललिता पाटील, उमेश पाटील, सुलोचना वाघ व शांताराम पाटील यांच्यासह महाविकास आघाडी तील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वानी उपस्थिती द्यावी, असे आवाहन दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम कोळी यांनी केले आहे.