इंजि. गिरीश सोनजी पाटील यांच्या नावे मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची विशेष सभा चेअरमन रावसाहेब देविदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघातील संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान प्रतिनिधी म्हणून इंजि. गिरीश सोनजी पाटील यांच्या नावे सर्वानुमते ठराव करण्यात आला.
या सभेत १३ पैकी १२ संचालक उपस्थित होते. या संचालकांनी सर्वानुमते इंजि.गिरीश सोनजी पाटील यांचा ठराव केला. सदर ठराव अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघातील संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान प्रतिनिधी म्हणून केला आहे. गिरीश पाटील हे अमळगावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. अमळगाव वि.का.सह. सोसायटी ही तालुक्यातील सर्वात मोठी संस्था असून त्यामध्ये अंमळगाव, खेडी सिम, खेडी खु, मेहरगाव, दोधवद, हिंगोणा या गावांचा समावेश आहे. सदर प्रसंगी सोसाचे व्हा.चेअरमन प्रवीण पाटील, लोकनियुक्त सरपंच इंजि.गिरीश पाटील, संचालक डॉ.पंकज चौधरी, राजेंद्र पाटील, संजय चौधरी, संजय पाटील, सुभाष पाटील, हिंमत पारधी, ज्ञानेश्वर शिंदे, प्रभावती पाटील, सुनीता पाटील, ग्रा.प.उपसरपंच जयेश कोळी, जयराम चौधरी, निखिल महाले, उल्हास पाटील, संजय धोबी, पिंटू पारधी, नाना कुंभार, दिपक पाटील, नरेंद्र चौधरी, गोविंदा चावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकिशोर व्यंकट पाटील, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.