हरिश्चंद्र कढरे यांच्या मातंगाची शौर्य गाथा पुस्तकाचे प्रकाशन

अमळनेर (प्रतिनिधी) लेखक हरिश्चंद्र कढरे यांच्या ‘मातंगाची शौर्य गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. शहरातील जी. एस. हायस्कूलच्या ग्लोबल लायन क्लब हॉल येथे  सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम झाला. या वेळी मान्यवरांसह साहित्य क्षेत्रातील रसिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. विजय तुंटे, सामाजिक चळवळीचे अभ्यासक व नेते प्रा.अशोक पवार, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे आणि प्रा.डॉ.मारोती गायकवाड(चोपडा), डॉ.माधव वाघमारे(नंदुरबार)उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.डॉ.मोरोती गायकवाड, उपासनी, अशोक बिऱ्हाडे, गोकुळ पाटील यांनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी  प्रा.विजय तुंटे(अमळनेर) यांनी आपल्या पुस्तकाच्या अभिप्राय संबंधी म्हटले की, हे पुस्तक वैचारिक व ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, मातंग समाजाच्या शौर्याची अभंग गाथा या पुस्तकामुळे वाचकांपुढे आली आहे,प्रत्यक्ष निरीक्षण व सहभागातून ग्रंथाचे लेखन झाले आहे. ज्ञान संपादनासाठी आपण इतिहासाचे अध्ययन करणे आवश्यक आहे. आपल्या वैचारिक प्रेरणा व जाणिवेचे स्रोत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत अशी वैचारिक भूमिका स्पष्ट केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.अशोक पवार यांनी लेखकाचे अभिनंदन करून ‘संविधान जागर’ संबधी मूलभूत स्वरूपाचे विचार यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी बन्सीलाल भागवत, भटू पाटील, मुख्याध्यापक एम. ए. पाटील, राजेंद्र चव्हाण, जितेंद्र कढरे, प्रविण शिरसाठ, सुनिल गरुड, डॉ.राजीव कांबळे, अवचिते, गौरव कढरे, ललित पाटील, गिरीश बेहेरे,शंकर कांबळे,डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील, उपप्राचार्य डॉ.एच डी जाधव,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.रवी बाळसकर, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.माधव वाघमारे, प्रा.यादव बोयेवार, डॉ. डी. डी. कर्दपवार, प्रा. गोपाळ पाचवणे, अरुण सोनूमोरे, डॉ. संजीव मुसळे, राजू पाटील, कुलकर्णी, मैराळे, एस. टी. पाटील, उज्वल पाटील, गुलाब शिरसाठ,रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कृष्णा पाटील यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण यांनी केले. आभार दयाराम पाटील यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *