मालपूर येथे शेतकऱ्यांना विविध पिकांचे मार्गदर्शन
अमळनेर(प्रतिनिधी) तालुका कृषी विभागातर्फे तालुक्यातील मालपूर येथे कापूस पिकातील कीड रोग सल्ला प्रकल्प योजनेअंतर्गत कापूस पिकाची कार्यशाळा झाली. यावेळी इतर पिकांवरील रोग,त्यांची निगा कशी घ्यावी यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या शेती शाळा वर्गात सहाय्यक कृषी अधिकारी चोपडा दिनेश देविदास पाटील यांच्या संकल्पनेतून उत्सव स्वातंत्र्याचा उत्सव शेती शाळेचा ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आली. या अंतर्गत शेती शाळेचे सर्व पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते.शेती शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. तर महिला भगिनींनी तिरंगा रंगाची साडी परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच शेती शाळेतील एकात्मता व त्या एकात्मतेतून शेती उत्पादनात होणारी वाढ याचा संदेश दिला.
शेती शाळेत पुरुष व महिला शेतकऱ्यांनी निरीक्षणे सादरीकरनात सक्रिय सहभाग घेतला,गावापासून ते शेती शाळा प्लॉटपर्यंत सवाद्य मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी, प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, तंत्र अधिकारी पी.व्ही.निकम,तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, दीपक साळुंखे, प्रशांत देसाई, यांनी प्रत्यक्ष फिल्डवर शेतकऱ्यांचे गट करून त्यांना मार्गदर्शन केले, चोपडा येथील सहकारी जितेंद्र सनेर व महेश सनेर यांच्या सोबतच कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले.