शहरात वाढतोय डेंग्यूचा डंक, ड्राय डे पाळण्याचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात डेंग्यूचा डंक वाढू लागला आहे. कसाली मोहल्ल्यात अकरा वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाली आहे. तर एक विद्यार्थी पुण्याहून अमळनेरला आला आहे. त्यामुळे नागरिकांनी डेंग्यूची साखळी तोडण्यासाठी ड्राय डे पाळवा, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शहरात पावसाळा सुरू झाला की डासांची उत्पत्ती वाढत जाते. त्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होत जाते. आधी तालुक्यातील धार येथे व सर्वज्ञ नगर धुळे रोड, न्यू प्लॉट, भांडारकर कंपाऊंड, विद्याविहार याठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. ते बरेही झाले आहेत. नुकतेच दोन रुग्ण आढळून आले आहेत. एक कसाली मोहल्ल्यातील साद शेख तौसिफ वय ११ तर पुण्याला शिकायला असलेला सुमेद सराफ हा अमळनेर ला उपचारासाठी आला आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सर्वत्र धुरळणी आणि फवारणी केली जात आहे. नगरपालिका रुग्णालयातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. डासांची उत्पत्ती थांबवून डेंग्यूची साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

सर्वेक्षणासाठी चार पथके 

 

पर्यवेक्षक किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सरला महाजन, गढरे, सरिता परदेशी, फाल्गुनी भावसार, विजय दासनुर, मंदा चौधरी, उल्हास माकडे, जयश्री बारी यांची चार पथके सर्वेक्षण करीत आहेत. नागरिकांच्या घरातील भांडे, फ्रीज, टायर, खुल्या जागेतील नारळाच्या करवंट्या, तुटलेले प्लास्टिक भांडे यातील डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. विहीर किंवा वापराच्या पाण्याच्या स्रोता मध्ये गप्पी मासे, उघड्यावरील डबक्यात अबेट आणि घाण पाण्यात ऑइल टाकले जात आहेत.

 

नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा

 

शहरातील नागरिकांनी कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू नियंत्रित होईल. स्वच्छता पाळावी. रस्त्यावरील घाणीबाबत तात्काळ नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाला कळवावे.

तुषार नेरकर, मुख्याधिकारी

नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी

 

पावासाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागात आरोग्य सहाय्यक, परिचारिका यांच्या मार्फत सर्वेक्षण सुरू आहे. डासांची  उत्पत्ती थांबवण्यासाठी धुरळणी, फवारणी नियमित केली जात आहे. एक डास अनेकांना चावू शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

डॉ विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी नगरपालिका अमळनेर 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *