अमळनेर रोटरी क्लबला ऊकृष्ट कार्य केल्याबद्दल 9 अवार्ड प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) अकोला येथे झालेल्या रोटरी वर्ष 2024-25 साठीच्या अवार्ड कार्यक्रमात अमळनेर रोटरी क्लबला ऊकृष्ट कार्य केल्याबद्दल 9 अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब अमळनेरने या रोटरी वर्षात जे सर्व समाज ऊपयोग कार्य केले त्याची नोंद घेत 9 अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर ते नासिक 100 क्लबचे 500 ते 600 रोटरी सभासदांसमोर हा कार्यक्रम पार पडला. दर वर्षा प्रमाणे या अमळनेर क्लबच्या 69 व्या वर्षात विविध कार्यक्रम करत रोटरीचे नाव जनमानसाच्या मनात नोंदवले. रोटरी क्लब अमळनेरच्या सर्व सभासदानी केलेल्या ऊकृष्ट कार्याची पावती रोटरी डिस्ट्रिक्टच्या डिजी राजिन्दरसिंग खुराणा व टिमने 9 अवॉर्ड देऊन केली. रोटरी अध्यक्ष ताहा बुकवाला यांनी हे आवार्ड सर्व सभासदांच्या मेहनतीचे फळ आहे व सर्व श्रेय मेंबरांना जाते असे सांगीतले. याबाबत रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये कौतुक होत आहे. तसेच अमळनेरच्या सर्व जनमानसात देखील खुप कौतुक होत आहे. असे अभिजीत सुभाष भांडारकर यांनी कळविले.
अमळनेर रोटरीला मिळालेले अवॉर्ड डिस्ट्रिक्ट अवॉर्ड 2024-25
कंजूमर आवरनेस गाइडन्स, बेस्ट वर्क डन डुरिंग नॅचरल क्लायमेटिक्स, बेस्ट सर्विस तो युथ, बेस्ट पब्लिक रिलेशन, प्रोजेक्ट अंडर एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट परसू प्लांट अर्थ, एप्लीकेशन अवार्ड फॉर डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज सेमिनार, एप्लीकेशन अवार्ड टू असिस्टंट गव्हर्नर आर टी एन अभिजीत भंडारकर, क्लब एक्सेलन्स अवॉर्ड, डायमंड सिटीजन ऑफ एक्सलन्स टू आर टी एन ताहा बुकवाला यांना मिळाला.