स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🔷 चालू घडामोडी :- 31 जुलै 2025
◆ जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो.
◆ 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
◆ इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम (EBP कार्यक्रम) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केला.
◆ ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची 2025 साठी जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून निवड केली आहे.
◆ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.
◆ जुलै 2025 मध्ये रामसर कन्व्हेन्शनच्या COP15 चे आयोजन झिम्बाब्वे देशाने केले आहे.
◆ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव व्हिक्टोरिया फॉल्स, झिम्बाब्वे येथे होत असलेल्या रामसर अधिवेशनासाठी कॉन्ट्रॅक्टिंग पक्षांच्या परिषदेच्या (COP15) 15 व्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
◆ Numbeo Safety Index 2025 मध्ये 146 देशात भारताचा क्रमांक 67वा आहे.
◆ विज्ञान संस्कृती संवर्धन योजना (SPOCS) ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची प्रमुख योजना आहे.
◆ राष्ट्रीय महिला आयोग (NCW) संस्थेने ग्रामीण महिलांसाठी यशोदा AI : भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू केले आहे.
◆ जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे नवीन अध्यक्ष म्हणून अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संस्थेने भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (IRNSS) विकसित केली आहे.
◆ पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन (नासा) या अंतराळ संस्थेने “TRACERS” नावाचे जुळे उपग्रह मोहीम सुरू केली आहे.
◆ बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सागरी वित्तपुरवठा शिखर परिषद 2025 चे आयोजित केले.
◆ प्रधानमंत्री वारसा संवर्धन (PM विकास) ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची प्रमुख योजना आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल