छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्काराने प्रा. नीता कुलकर्णी सन्मानित
अमळनेर (प्रतिनिधी) नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद दिल्लीतर्फे शिरपूर येथील इंग्रजीच्या प्रा. नीता कुलकर्णी यांना राष्ट्रीय स्तरावरील “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
प्रा. कुलकर्णी या शिरपूर महिला महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका असून, त्या उपप्राचार्य प्रा. ए. एन. कुलकर्णी आणि सरिता कुलकर्णी (रा. राजहोळी चौक, अमळनेर) यांच्या सुपुत्री आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि विशेषतः ग्रामीण-आदिवासी भागातील महिलांसाठी केलेले कार्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एका वेगळ्या उंचीवर नेते. या कार्यक्रमास माजी खासदार हिनाताई गावित, डीडीसी बँकेचे संचालक श्यामकांत समीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी पी. एम. रोकडे, प्रा. मंदाकिनी भामरे, प्रफुल्ल सीताराम पाटील, ईश्वर पाटील, योगेश बागुल, कैलास पाटील, डॉ. ज्योती लष्करी आदी मान्यवर उपस्थित होते.