खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

वैशाली पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानीत

अमळनेर (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील रहिवासी वैशाली नितीन पवार यांना इचलकरंजी जि कोल्हापूर येथील वसुंधरा शक्ती सामाजिक संस्थेचा 2019 या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वैशाली पवार या गुड शेफर्ड इंग्लिश मेडियम स्कूल या स्कुलच्या माजी मुख्याध्यापिका असून आता त्यांनी स्वतःची गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल नावाची स्वत:च्या शिक्षण संस्था उघडली आहे. त्या नेहमी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्नशील असतात. शहरातील शेतमजूर स्त्रियांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणे, समाजातील सर्वच स्तरातील मुला-मुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे त्यांचे कार्य सतत सुरु असते. सध्या त्या जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांना एक चांगल्या समाजसेविका म्हणून ओळखले जाते.धरणगाव तालुका चौधरी समाज यांच्याकडून त्यांचा यापूर्वी आदर्श शिक्षिका म्हणून गौरव झाला आहे तसेच गुड शेफर्ड अकॅडमी च्या वतीने त्यांना शिस्त व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button