खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत 133 शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षकांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 133 शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षकांची नियुक्ती  करण्यात आली आहे. या प्रशिक्षणार्थीना मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी नियुक्ती पत्र देण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील आणि शिक्षण विभाग, केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत हे नियुक्ती पत्र पंचायत समितीच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात देण्यात आले, यात 130 प्रशिक्षणार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तर 3 प्रशिक्षणार्थींना उर्दू माध्यमाच्या शाळेंवर नियुक्ती देण्यात आली. सदर कार्य प्रशिक्षण कालावधी, रुजु झालेपासुन ६ महिने असून त्यांनतर सेवा संपुष्टात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button