खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तालुक्यात संसर्ग रोखण्यासाठी सोयी सुविधा बेड, औषध, पुरवठावर प्रशासनाची नजर 

अमळनेर (प्रतिनिधी) संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यात वॉर रूमची व्यवस्था, नागरिकांच्या अडचणी व रुग्ण व्यवस्था करणे, सोयी सुविधा, बेड औषध पुरवठा यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपायायोजना करण्याबाबत  जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.
अमळनेर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या अधिक निर्माण झाल्या आहेत. दवाखाने फुल्ल झाले असून रेमेडिसिव्हर इंजेक्शन तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर अडी अडचणी सोडवण्याकामी अधिकारी व डॉक्टर्स यांच्याकडे सोई सुविधा उपलब्ध करुन देणे व समन्वय राखणे याकरीता तसेच रुग्णांना आवश्यकतेप्रमाणे बेड्स उपलब्ध करुन देणे, औषध पुरवठा करणे, शहरात सुरु असलेल्या अँटिजेन  कॅम्प ची माहिती मिळणे तसेच वैद्यकीय सहाय्यक यांची आवश्यकता आहे. त्यामुळे दाखल होणारे रुग्णांना आवश्यक सर्व सोई तात्काळ उपलब्ध होतील, व समस्या निर्माण होणार नाही याकरीता प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी शनिवारी वॉर रूमची व्यवस्था केली आहे. व त्याबाबत आदेश काढले आहेत.
अमळनेर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून नगरपरिषद, अमळनेर येथे वॉर रुमची स्थापना करण्यात आली  असून खालीलप्रमाणे अधिकारी डॉक्टर्स यांचेवर जबाबदारी सोपविण्यात येत आहे.
त्यात अधिकारी डॉक्टर्स यांचे नाव व पदनाम दूरध्वनी क्रमांक देण्यात आले असून शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांच्याकडे बेड मैनेजमेंट – शहरातील खाजगी रुग्णालय, अधिकारी, पं.स., अमळनेर ग्रामीण रुग्णालय, इंदिरा भवन यांचेशी ताळमेळ राखून आवश्यकतेप्रमाणे रुग्णांना बेड उपलब्ध करुन देणे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तर पालिका औषध निर्माता महेश जोशी यांनी औषध पुरवठा बाबत आवश्यक ते सर्व कार्य औषधनिर्माता म्हणून जबाबदारी पार पाडणे. शहरातील मेडिकल दुकानदार, पुरवठादार यांचेशी समन्वय साधून रुग्णांना आवश्यक ती औषधे उपलब्ध करुन देणे,
पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, यांच्याकडे अमळनेर शहरात होणाऱ्या अँटिजेन चाचणी कॅम्पचे नियोजन व माहिती उपलब्ध करुन देणे तर तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीष गोसावी यांच्याकडे ग्रामीण भागातील रुग्णांकरीता वैद्यकीय सहाय्यकची जबाबदारी पार पाडणे आदी कामे पार पाडायची असून तरी वरील प्रमाणे जबाबदारी ही आपणावर सोपविण्यात आलेली आहे. तरी वरील संबंधित डॉक्टर्स व अधिकारी यांनी त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडायी.
यात समावेश असलेल्या अधिकारी डॉक्टर्स यांना कोणत्याही प्रकारे रजा, सूट परस्पर घेता येणार नाही.  अपवादात्मक सूट घ्यावयाची असल्यास तहसिलदार यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तहसिलदार  यांनी संबंधित अधिकारी यांच्या रजा कालावधीत पर्यायी अधिकारी/डॉक्टर्स यांची नियुक्ती करण्याची अतिरिक्त कार्यवाही  करावी. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी डॉक्टर्स यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्यास संबधितावर भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८, आपत्ती व्यवस्थापन कायदा ३००५ मधील कलम ५१ ते ६० मधील तरतुदीनुसार करवाई करण्यात येईल.असे आदेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी देऊन वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button