खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नंदगावला येथे तरुणाची नैराश्यातून घरातच गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) नैराशातून एकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नंदगाव येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

नंदगाव येथील नरेंद्र हिरामण पाटील (वय ४०)  याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आई दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे गेलेली होती. पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी आहे. यामुळे तो नैराशयात होता. शुक्रवारी घरात एकटा असल्याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब शेजारी राहणाऱ्या किशोर पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच नरेंद्र पाटील यांच्या सावत्र भाऊ गणेश पाटील यांना कळविले. त्यांनी त्याला तात्काळ अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. नरेंद्रला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्च्यात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button