खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

करणखेडे सरपंचपदी कविता पाटील तर उपसरपंचपदी कविता धनगर यांची लागली वर्णी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील करणखेडे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता महेंद्र पाटील यांची तर उपसरपंचपदी कविता भानुदास धनगर यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.पि.साळुंखे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक मुकेश साळुंखे यांनी सहकार्य केले.
अमळनेर तालुक्यातील करणखेडे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर नूतन सरपंच कविता पाटील यांचे पती महेंद्र पाटील हे सुद्धा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले आहेत. यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य अलकाबाई गुलाबराव धनगर, गणेश शांताराम गुरव, प्रतिभा कैलास धनगर, महेंद्र सुरेश पाटील, राकेश विजय भील आदी उपस्थित होते. तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी सरपंच व उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल स्वागत केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button