खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मिनी डोअर मधून अवैध देशी विदेशी मद्याची तस्करी करणार्‍या एकाला अटक

पोलिसानी १३,४१२ रुपये किमतीचे मद्य आणि मिनी डोअर ही केला जप्त

 

अमळनेर (प्रतिनिधी ) मिनी डोअर मधून अवैध देशी विदेशी मद्याची तस्करी करणार्‍या एकाला अटक करून १३,४१२ रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. अमळनेर पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, १ ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनचे अंमलदार सुनिल कौतिक हाटकर , दिपक विसावे , हितेश चिंचोरे , भुषण बाविस्कर , राहूल चव्हाण यांचे पथक तयार करुन  धुळे रोडवरुन (एम एच – १८ – टी – ७६०) हे तीन चाकी वाहन पकडून  पाच बॉक्स देशी व विदेशी दारु जप्त केली. याप्रकरणी प्रविण हिंमत कापडणे (वय -३५ वर्षे , रा . जानवे ता . अमळनेर) याला अटक करण्यात आली.
तर  १३,४१२ रूपयांची देशी व विदेशी दारु आणि  ५५,०००  रुपये किमतीची मिनी डोअर असा ६८४१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे . त्यांच्यावर अमळनेर पो.स्टे . महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १ ९ ४ ९ चे कलम ६५ ( अ ) व ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना अलोक साबळे हे करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button