: प्रश्न 1. मध्य प्रदेश सरकार ने किस जिले में डकैत संग्रहालय बनाने का निर्णय लिया है ? उत्तर – भिंड प्रश्न 2. RBI के द्वारा वित्तीय साक्षरता सप्ताह 2021 कब मनाया गया है ? उत्तर – फरवरी 8-12 प्रश्न 3. भारत सरकार ने किस देश में खाद्य सुरक्षा को …
पाडसे, प्र.डांगरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची बिनविरोध निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडसे, प्र.डांगरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी समर्थकांनी जल्लोष केला. पाडसे ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा चिंतामण पाटील यांची निवड अमळनेर तालुक्यातील पाडसे ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा चिंतामण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन निवडणूक निर्णय अधिकारी गौरव सोनार ग्रामसेविका देशमुख,यांनी काम पाहिले. यावेळी …
मिरवणूक न काढताच कार्यक्रमस्थळी शिवरायांना दिली जल्लोषपूर्ण मानवंदना
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शिवजयंतीची मिरवणूक न काढताच शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे विविध कलपथकांच्या कार्यक्रमातून शिवरायांचा जयघोष करीत कार्यक्रम स्थळीच जल्लोषपूर्ण वातावरणात मानवंदना देण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, …
अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने पिकांचे पंचनामे करा
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रांत अधिकार्यांना निवेदन देऊन केली भरपाई देण्याची मागणी अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून कृषी विभागामार्फत त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे …
जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या संपर्कामुळे आमदार अनिल पाटीलही होम क्वांरटाईन
आरसीपीटीआर व अँटीजेन चाचणी करून अहवाल प्राप्त होईपर्यंत राहणार क्वांरटाईन अमळनेर (प्रतिनिधी) गेल्याच आठवड्यात संवाद यात्रेनिमित्त अमळनेरात येऊन गेलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने त्यांच्या संपर्कात आलेले आमदार अनिल पाटील यांनीही आपली टेस्ट करून घेत होम क्वारंटाईन झाले. आमदार अनिल पाटील …
एलसीबीच्या पथकाने झामी चौकातून एका जुगाऱ्याला केली अटक
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील झामी चौकात एलसीबी पथकाने धाड टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्या एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६७० रुपये रोख आणि जुगारीचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एलसीबीचे सहा पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील ,नरेंद्र वारुळे यांना झामी चौकात सट्टा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी …
अवकाळी पावसाने वीजपुरवठा खंडित, निम येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वीजपुरठा खंडित झाला होता. याच वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नीम येथे शेतकऱ्याला घराच्या अंगणातील पायरीजवळ संर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निम येथे गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला होता. …
शिवजयंती निमित्ताने सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) चौबारी येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, स्टार्स अकॅडमी अमळनेर आणि छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने सामान्यज्ञान स्पर्धा झाली. स्पर्धेत लहान गटात प्रथम युवराज राजेंद्र पाटील, द्वितीय चैताली मल्हारी पाटील, तृतीय प्रियांशु दीपक पाटील, उत्तेजनार्थ तुषार बारकू पाटील, स्वप्निल गंगाराम पाटील. मोठ्या गटात प्रथम योगेश राजेंद्र पाटील, द्वितीय राहुल …
सारबेटे येथे साठ वर्षात पहिल्यांदाच।सर्वसाधारण महिला झाली सरपंच
राष्ट्रवादीच्या बानोबी मेवाती सरपंचपदी तर नईम खान यांची उपसरपंचपदी निवड अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवत झेंडा फडकावला. तर साठ वर्षांत पहिल्यांदा सर्वसाधारण महिला सरपंचपदी बानो बी इस्माईल खा मेवाती यांची तर उपसरपंचपदी युवा नेतृत्व म्हणून नईम खान कय्युम खान मवाती यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक …
कामामध्ये कसुरीचा ठपका ठेवत पीआय अंबादास मोरे कंट्रोल जमा
पीआय दिलीप भागवत यांच्याकडे सोपवला अमळनेर पोलिस ठाण्याचा पदभार अमळनेर (प्रतिनिधी) शहारात लावण्यात आलेलेल बेकायदेशिर होर्डिंग्जवर कारवाई प्रकरणात एकाच गटाचा गुन्हा दाखल करून घेत उपमुख्याधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून कामात कसुरी केल्याने अखेर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांना कंट्रोलजमा करण्यात आहे. तर त्यांच्या जागी जळगाव नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक …