खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मिरवणूक न काढताच कार्यक्रमस्थळी शिवरायांना दिली जल्लोषपूर्ण मानवंदना

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शिवजयंतीची मिरवणूक न काढताच शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे विविध कलपथकांच्या कार्यक्रमातून शिवरायांचा जयघोष करीत कार्यक्रम स्थळीच जल्लोषपूर्ण वातावरणात मानवंदना देण्यात आली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक , न.पा. चे संजय चौधरी, नगरसेवक श्याम पाटील, भरत पवार, प्रा.जयश्री साळुंखे, माधुरी पाटील, मराठा सेवा संघाचे मनोहर पाटील , सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे मनोज शिंगाने व मित्र परिवाराने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून पूजन केले. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी  सूत्रसंचालन केले. यावेळी ‘जय जिजाऊ जय शिवराय!’च्या घोषणांनी शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. शिवभक्तांमध्ये शिवजयंती चा जल्लोष यंदाही कायम होता .

नादब्रह्म ढोल पथकाच्या युवतींची शिवगर्जना

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर  नादब्रह्म ढोल पथकाच्या युवतींनी शिवगर्जना करीत ढोलताश्यांच्या गजरात कार्यक्रम सादर केला. तर नीलिमा सोनकुसरे व पूनम हटकर यांचे लहान मुलामुलींच्या वृक्षवल्ली लेझिम पथकानेही  शानदार सादरीकरण केले. अमळनेर शहर व तालुक्यातुन युवकांनी मोठा सहभाग घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करीत पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत कला पथकांनी शिवरायांना मानवंदना दिली. शिवजयंती चा जन्म असलेल्या चि. शिवतेज शिंदे चा मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शिवभक्तांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी फेटे पुरविले. पिण्याच्या पाण्याची सोय राहुल कंजर, तुषार सोनार, यांनी केली. अल्पोपहाराची व्यवस्था निखिल चव्हाण, राजेश कुंदनांनी यांनी तर छायाचित्रनासाठी उत्स्फूर्तपणे वाजिद शेख,जयेश शिंदे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button