खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अनिल दादांनी खूप सोसलेत पराभवाचे चटके आता आमदारकीचे मिळवून देऊ यश हटके…

सौभाग्यवतींचेही दुर्भाग्यच..!

अमळनेर (प्रतिनिधी) सामाजिक कार्याची आवड असल्यानेच हिंगोणे सारख्या लहानशा गावातून भाजपाचे माजी आमदार बी.एस. पाटील यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केली. लोकांशी थेट संर्पक आणि प्रत्येकाच्या कामासााठी पुढाकर घेण्याचे उपजत गुण असल्याने प्रत्येक मानसाच्या ओठावर अनिल दादा हे नाव येऊ लागले. पण आपल्या राजकीय जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पैशांचा चुराडा होऊनही यशाची हुलकावणी मिळत गेल्याने खचलेल्या या खंबीर नेतृत्त्वाला आता एकदा तरी गंभीरपणे मतदार संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली पाहिजे, असे नागरिक आता स्वतः बोलू लागले आहेत.

राजकीय आणि सामाजिक कार्य करीत असताना अनिल दादा यांनी चांद्यापासून बांध्यापर्यंत अमळनेर मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यामुळे ते प्रत्येक गावात आणि घरात परिचित आहेत. त्यांचे हे काम पाहूनच भाजपात असताना २००९ मध्ये आणि २०१४ मध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्षीय अंतर्गत बंडाळीमुळे त्यांना दोन्हीवेळी अपयशच पचवावे लागले. ऐवढेच नव्हे तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतरही सत्तेत भागीदार होता आले नाही. कारण ते भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य होते. तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. हे सर्व अपयश पचवत असतानाचा माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादी काँगेसमध्ये नेले. कालांतराने साहेबराव दादांनी राष्ट्रवादीला रामराम करीत भाजावासीय झाले. ज्यांच्या शब्दाखातीर ते राष्ट्रवादीत गेले तेही त्यांना सोडून आले. तरीही ते डगमगले नाहीत. म्हणूनच त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहज उमेदवारी मिळाली आहे. या सर्व प्रक्रियेत त्यांचा आर्थिक चुराडा होत गेला. पण ते मनाने खचले नाहीत. अपयश हे त्यांनी मोठ्या हिमतीने पचवून आपले सामाजिक कार्य आणि राजकीय वाटचाल मोठ्या नेट्याने सुरूच ठेवले होते. म्हणूनच याच्यातून आणखी खंबीर नेतृत्त्व करण्याची ताकद त्यांना मिळाली आहे.

सौभाग्यवतींचेही दुर्भाग्यच..!

अनिल दादा यांच्या सौभाग्यवती जयश्रीताई पाटील या शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षा होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले. सर्व सुरळती असतानाच चौधरी बंधूंना आमदार की पदरात पाडून घ्यायची होती म्हणून चिरीमिरी देऊन नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण झाले. आणि त्यांना नगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच त्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या. मात्र जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आल्याने त्यांनाही सत्तेपासून दूरच राहावे लागले. पती अनिल दादा भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य असताना सत्ता राष्ट्रवादीची होती आणि त्यांची पत्नी राष्ट्रवादीची जिल्हा परिषद सदस्य असताना सत्ता भाजपाची आली. त्यामुळे या दोघांनाही नियतीने सत्तेपासून लांब ठेवले. ऐवढेच नव्हे तर पुष्पलता पाटील नगराध्यक्षा बनताना बोगस मतदान रोखण्यावरून अनिल दादांना “मार” ही खावा लागला आहे. हे जनतेने पाहिले आहे. यातूनच त्यांच्यावर सतत अन्याय होत गेला आहे. लाखो-करोडो खर्च झाले आहेत. तरी या दोघांनी आपली सामाजिक बांधिलकी कधीच सोडलेली नाही. म्हणूनच एकदा भूमिपुत्राला संधी द्यावी, असे ग्रामिण भागासह शहरातील असंख्य लोक बोलू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button