खौशी येथून पारंपरिक कावड यात्रा उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खौशी येथून पारंपरिक कावड यात्रा उत्साहात पार पडली. ही पवित्र यात्रा खौशी गावातून प्रारंभ होऊन नांद्री, पातोंडा, सावखेडा, निमगव्हाण मार्गे श्री दादाजी मठ येथे पोहोचते. तेथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविक पायदळ परतीच्या प्रवासाला निघतात. वाटेत सावखेडा, पातोंडा, नांद्री येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात.
याच यात्रेनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रणव नंदलाल चौधरी व सर्व मित्र परिवाराकडून भाविक भक्तांसाठी चहा-पाणी व केळी वाटप सेवेचे आयोजन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला पातोंडा गावाचे सरपंच विजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते तसेच मंगेश पवार, भूषण सूर्यवंशी, स्वप्निल पवार, शुभम राजेंद्र पवार, इं. जी. शुभम पवार, हर्षल पाटील, पियुष पवार, सुमित बिडकर, आदित्य पवार, चेतन पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.