दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन एकाचा मोडला पाय

अमळनेर (प्रतिनिधी) दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात  एकाचा पाय मोडला जाऊन मोटरसायकलमध्ये हाड अडकून पडला. ही घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर  बहादरवाडी फाट्याजवळ वळणावर  ४ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.

      याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, भरत चौधरी (रा. पारोळा) हा गाडी (क्रमांक एम एच १२ एफ एन ३६१) वर मुलगी व पत्नीसह मंगळदेवग्रह  मंदिरावर दर्शनासाठी येत होता. तर छोटू भिल (रा. सडावण) हा डबलशीट अमळनेर हुन मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ डी ५५८१ ) वर सडावण कडे जात असताना बहदरवाडी फाट्याजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली. त्यात भरत चौधरी याचा पाय मोडून पायाचे हाड मोटरसायकलच्या टूल बॉक्स च्या प्लास्टिक मध्ये अडकले. त्याला तातडीने पारोळा येथे रवाना करण्यात आले तर छोटू भिल हा देखील जखमी झाल्याने त्याला अमळनेर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल उदय बोरसे, मिलिंद सोनार,  विनोद संदानशिव, चरण पाटील, सुनील पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना उपचारासाठी रवाना केल्यावर  मोटारसायकली पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *