खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तुतारी फुकत विरोधकांशी भांडू म्हणणारे साहेबराव दादा माती खात निघाले ‘गांडू’ळ

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदार संघात पुन्हा परिवर्तनाचा निश्चय करणाऱ्या मतदारांशी गद्दारी करीत मंत्री अनिल पाटील त्यांच्यापुढे लोटांगण घालत माती खाल्ली आहे. निवडणुकी आधीच तुतारी फुकत विरोधकांशी भांडू म्हणणारे ‘दादा’  ‘गांडू’ ळ निघाले आहे. त्यामुळे ‘पावर’ नितीत मंत्री अनिल पाटील आता खऱ्या अर्थाने अमळनेर मतदार संघांचे ‘दादा’ आहेत. हे सारं उमेदवारीसाठी उडणाऱ्या साहेबराव दादांची पिसे उखाडण्याचे काम धुळ्यातील कृष्णाई हॉटेल मध्ये घडलं…

माजी आमदार साहेबराव दादा यांनी बदललेल्या राजकीय समीकरणाचा लाभ घेण्यासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात शेड्डू ठोकले होते. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच अमळनेर मतदारसंघात पावसाळ्यातच निवडणुकीच्या वातावरण तापले होते. नुकताच जळगाव येथे येऊन गेलेल्या जयंत पाटलांना साहेबराव दादा यांनी भेटून वय झाले तरी तुतारी फुंकण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मंत्री अनिल दादा यांच्या पायाखालची वाळू घसरली. साहेबराव पाटीलचे आव्हान पेलण्यापेक्षा त्यांना गाडण्याची रणनीती त्यांनी आखाली यासाठी त्यांनी सुरवातीला माजी नगरसेवकांची फौज पाठवली. यात साहेबराव पाटील थोडे गारदले. त्यांनतर रविवार साधत मंत्री अनिल दादा आणि साहेबरावं दादा यांनी धुळ्यात हॉटेल कृष्णाई गाठली. याचा वास अमळनेकर भोळ्या जनतेला आला. खात्री करण्यासाठी प्रत्येकाचे फोन खणखणले..कोणालाच खात्री पटेना.. अखेर खबरीलालच्या कानावर ही खबर आली आणि थेट धुळे जाऊन हॉटेल कृष्णाई गाठली. तेथे गाड्यांचा फौजफाटा होता… तर कोणालाही वास येईल अशी अनिल दादा आणि साहेबराव दादा यांच्यात गुप्त’गु’ सुरू होती..साहेबराव दादा यांना खोक्यासोबत नगरपालिका आणि अनिल दादा विधानसभा सांभाळणार असा फॉर्मुला ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दादा, व्हाट्स इज धिस असे नागरिक विचारत आहेत.

 

दादा आता पुन्हा बोर विकणार..

 

साहेबराव दादाच्या रूपात नागरिक भावी आमदार पाहत होते. परंतु दादाने तुतारी फुकण्या आधीच खालून ‘हवा’ सोडून दिल्याने नागरिकांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे विधानसभेत नाही तर नगरपालिकेत कशाला? असा प्रश्न उपस्थित करून आता त्यांचे उखळ पांढरे होऊ द्यायचे नाही.. त्यांना बोर वेचायला आणि विकाला जावे लागेल. सागाला पाणी टाकावे लागेल. यातून राजकीय सन्यास त्यांना घ्यावाचं लागेल यात तीळ मात्र शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button