खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पूर्ववैमनस्यातून मालपूर येथील शेत शिवारात लाठ्या काठ्यांनी मारहाणीत एकाचा खून

अमळनेर (प्रतिनिधी) पूर्ववैमनस्यातून मारहाण करीत तालुक्यातील मालपूर येथील प्रभाकर विनायक पाटील याचा शेत शिवारात खून केल्याची घटना १९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रभाकर विनायक पाटील यांचे प्रेत शेतात आठ वाजेच्या सुमारास आढळून आले. त्याच्या अंगावर लाठ्या काठ्यांचे व्रण उमटल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील , मुकेश साळुंखे यांनी भेट दिली. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती असून मयताच्या मुलाने काही जणांची नावे सांगितली आहेत मात्र पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button