खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

भगिनी मंडळाची आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना स्नेहभेट

अमळनेर (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त भगिनी मंडळाची आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना स्नेहभेट वितरण करण्यात आले. स्नेहभेट मिळाल्याने महिला कर्मचारी भारावून गेल्या.

जागतिक महिला दिनानिमित्त भगिनी मंडळाच्या बालवर्ग व प्राथमिक शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला भगिनी मंडळ संस्थेतील ज्येष्ठ सल्लागार रजनीताई केले यांच्याकडून स्नेहभेट वितरण करण्यात आले. सदरील कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्षा. सरोजताई भांडारकर, उपाध्यक्ष  मंगला पाटील, कार्याध्यक्ष शोभा देशपांडे, सेक्रेटरी अनुपमा भांडारकर, सह सेक्रेटरी  मोहिनी खाडीलकर, शाळा समिती सेक्रेटरी  वनश्री अमृतकार व सह सेक्रेटरी सौ. उज्वला शिरोळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला सोनवणे  उपस्थित होत्या. तसेच भगिनी मंडळाचे बालक मंदिर व प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रजनीताई केले यांनी त्यांच्या कार्यकाळातील मंडळाच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल आणि आपल्या प्रगल्भ विचारातून शाळेविषयी व शिक्षकांविषयी असणारी आपुलकी व सद्भावना व्यक्त केली. तसेच तृप्ती खैरनार यांनी ‘लेक वाचवा लेक शिकवा’ या विषयावर एकपात्री नाटक सादर केले. मुख्याध्यापिका  मंगला सोनवणे यांनी सर्वांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्नेहभेटीबद्दल व सन्मानित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तृप्ती खैरनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी चहा पानाचा आस्वाद घेत कार्यक्रमाचे सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button