खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बाळासाहेबांची शिवसेना शाखेची अमळनेर शहर आणि तालुक्याची कार्यकारणी जाहीर

अमळनेर (प्रतिनिधी) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अमळनेर शहर व तालुक्याची कार्यकारणी जाहीर जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार व आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वात अमळनेर शहरप्रमुखपदी संजय कौतिक पाटील, उपजिल्हाप्रमुखपदी देशमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी सुरेश अर्जुन पाटील, तालुका संघटकपदी डाॕ.दिपक पंढरीनाथ पाटील, उपतालुकाप्रमुखपदी चंद्रशेखर ताराचंद पाटील, शहर संघटकपदी साखरलाल शांताराम माळी, उपशहरप्रमुखपदी प्रविण पुरूषोत्तम पाटील, युवासेना तालुकाप्रमुखपदी गुणवंत बापुराव पाटील, युवासेना शहरप्रमुखपदी भरत प्रकाश पवार व युवासेना उपशहरप्रमुखपदी विजय उगलाल पारधी यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, बबलु पाटील, प्रथमेश पवार, प्रा.बी.एन.पाटील यांचेसह शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button