खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

‘हाई अँटीकरप्शननी पोर लाचखोर ले पकडाले चालनी… महाग पडी जाई भावड्या तुले हाई लाचनी मागणी…’ !

एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांची अहिराणी गीतातून सरकारी बाबूत जनजागृती

 

अमळनेर (प्रतिनिधी) शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात वाढत असलेल्या लचखोरीला आळा बसावा म्हणून नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी हाई झुमकावाली पोर या सुप्रसिद्ध अहिराणी गीताच्या चालीवर ‘हाई अँटीकरप्शननी पोर लाचखोर ले पकडाले चालनी… महाग पडी जाई भावड्या तुले हाई लाचनी मागणी…’  असे जनजागृतीपर अहिराणी गीत सादर केले असून महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध झाले आहे. या गीताचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. अत्यंत आशयघन हे गीत असल्याने त्याचे कौतुक केले जात आहे. अनिल बडगुजर हे अमळनेर, जळगाव येथील रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनतर धुळे येथे लाचलुचपत विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते नाशिक येथे आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. याच आपल्या कलेचा सामाजिक कार्यासाठी वापर करता येईल का याचा विचार करून त्यांनी ‛हाई झुमका वाली पोर …’ या गीताच्या चालीवर ‛हाई अँटीकरप्शननी पोर लाचखोर ले पकडाले चालनी …महाग पडी जाई भावड्या तुले हाई लाचनी मागणी’  असे म्हणत जनजागृती केली आहे. सरकारी कामाचा तू पगार घेतो , ते तुझे कर्तव्य आहे त्याचे तू पैसे घेऊ नको , गरिबांची तू हाय घेशील ते तुझे लेकरे आणि बाळे भोगतील अशा भावनिक शब्दात त्यांनी गीतातून जनजागृती केली आहे. सरकारी  कर्मचारी आणि अधिकारी यापैकी कोणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाशी बिनधास्त संपर्क  साधण्याचे आवाहन त्यांनी अहिराणी भाषेतून सुमधुर  संगीताच्या चालीवर केल्याने या गीताची शासकीय दरबारी आणि अहिराणी भाषिकांमध्ये चांगलीच चर्चा आहे.   गीत रचना स्वतः अनिल बडगुजर यांनी केली आहे. तर गीतासाठी व्हिडीओ व चित्रीकरण एस कुमार यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button