खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर येथे मिल के चलो संस्थेतर्फे विज्ञान शिक्षक कार्यशाळेसह झाले विविध कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली . या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारची अग्रनामांकित विज्ञान शिक्षण संस्था आयसर पुणे येथील संस्थापक शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू व अध्यक्ष म्हणून जळगाव येथील नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील हे उपस्थित होते. या कार्यशाळेत विज्ञान शिक्षण आणि संशोधनातील संधी यावर डॉ. नातू यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी शिक्षकांना नोबेल पारितोषिक मिळवणारे मुले कसे घडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मिल के चलो असोसिएशनचे संस्थापक अनिरुध्द पाटील व कल्याणी पाटील यांनी संस्था नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन दिले. त्यानंतर निवडक मुलांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यात प्रामुख्याने जि.प.प्राथमिक शाळा नंदगाव, पिंगळवाडे, गडखांब, देवगाव-देवळी आणि श्री बी.बी.ठाकरे हायस्कूल, वावडे येथील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी वर्धापन दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात या प्रदर्शनातील मुलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अरविंद नातू व अध्यक्ष जेष्ठ शिक्षणतज्ञ हेमाताई होनवाड यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. सायंकाळच्या कार्यक्रमात पालकांची देखील उपस्थिती उल्लेखनीय होती. शिवाय या कार्यक्रमात उपक्रमातील विद्यार्थी व उपक्रमशील शिक्षक यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मार्गदर्शक श्री दत्तात्रय सोनवणे सर व चंद्रकांत पाटील सर यांनी केले. कार्यक्रमात अमळनेर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, कार्याध्यक्ष .डी.के.पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, एस.डी.देशमुख, आर एस पाटील, जी.डी.पाटील, प्रमिला अडकमोल , भाग्यश्री वानखेडे यांनी विज्ञान मंडळातर्फे डॉ नातू यांचा सत्कार केला. सायंकाळच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे व उमेश काटे यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक प्रकाश पाटीलव करुणा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजनात संस्थेचे सदस्य सिद्धार्थ पाटील, प्राजक्ता पाटील, प्रा. विनायक पाटील, चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, प्रिया ठाकरे, गोपाल गावंडे, सुनिल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button