खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नितेश मांछरे यांनी रशियातून मिळवली एमबीबीएसची पदवी

कंजरभाट समाजातील दुसरा डॉक्टर होण्याचा मिळवला बहुमान

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कंजर भाट समाजातील सर्वसामान्य कुटुंबातून डॉक्टर नितेश मांछरे यांनी रशियातून एमबीबीएसची पदवी रशिया येथील स्टेट मेडिकल अकॅडमी येथून पूर्ण केली. त्यांच्या यशाचे समाजातून स्वागत करण्यात येत आहे.
नितेश मांछरे यांनी आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अतिशय जिद्दी व चिकाटीने वैद्यकीय पदवी म्हणून आपले व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांच्या आई-वडिलांच्या स्वप्न मुलाला डॉक्टर बनवायचं होते. नर्सरी पासून तर बारावीपर्यंत शरद पवार इंटरनॅशनल स्कूल कळवण येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिद्द व चिकाटीने कंजर भाट समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला. या समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे अमळनेर हे संतांची भूमी आहे या भूमीतून समाजातील हा दुसरा एमबीबीएसडॉक्टर झालेला आहे. सहा वर्ष रशिया येथे आपल्या फॅमिलीपासून दूर राहून त्यांनी यश मिळवले आहे. त्यांनी कोरोना काळात डॉक्टर अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्येही एक वर्ष प्रॅक्टिस केली आहे ते दिनाक २२ जून रोजी शिक्षण पूर्ण करून रशियातून अमळनेराल परतले आहेत. कंजरभाट समाज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्था मार्फत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
त्यांच्या लहान भावाने बी फार्मसी केली आहे, बहिण चार आहेत. शिक्षणासाठी वडिलांनी प्रेरणा दिली घरात वडील १२ पर्यंत शिक्षित आहे. लहानपणापासूनच हालाखीची परिस्थिती असताना त्यांनी गरिबी काय आहे हे बघितली असल्याकारणाने गोरगरिबांसाठी आपण आपल्या स्वतःचा एक हॉस्पिटल अमळनेरमध्ये बांधावं आणि गोरगरिबांसाठी जेवढी मदत होईल आपल्या परीने तेवढी करावी, अशी त्यांची इच्छा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button