अर्बन बँकेच्या निवडणुकीत तब्बल 29 उमेदवारांचे 49 अर्ज केले दाखल

आज व उद्या दोनच दिवस शिल्लक असून या मुदतीत अजून काहींचे अर्ज दाखल होणार

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काल 9 रोजी अनेकांनी शुभ मुहूर्त साधल्याने अर्जाचा पाऊस पडला.29 उमेदवारांचे 49 अर्ज दाखल झाले. यानिमित्ताने बँकेच्या आवारात मोठी गर्दी उसळली होती.
यावेळी विद्यमान संचालक असलेल्या सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारासह 29 उमेदवारांनी 49 अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल।केले.आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज व उद्या दोनच दिवस शिल्लक असून या मुदतीत अजून काहींचे अर्ज दाखल होणार आहे.काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी, गोविंददादा मुंदडा, कुंदनलाल अग्रवाल, माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील,मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे,संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडा,डॉ संदेश गुजराथी, अध्यक्ष जितेंद्र झाबक,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,बाजार समितीचे सर्व संचालक यासह राजकीय,सामाजिक आणि व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राखीव जागेवर रणजित शिंदे पुन्हा उतरले रिंगणात

विद्यमान संचालक असलेल्या सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांची नावे घोषित केली आहे. त्यात सर्वच मागील उमेदवारांचा समावेश आहे. केवळ अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे उमेदवार शांताराम तुकाराम ठाकूर यांचे निधन झाल्याने सदर जागा रिक्त आहे. तर गेल्या निवडणुकीत शांताराम ठाकूर यांच्या विरोधात उभे राहीलेले रणजित भास्कर शिंदे यांनी लक्षवेधी लढतीत अल्पकाळातच सर्वाधिक दोन नंबरची मते मिळवली होती. त्यांचा निसटता पराभव झाला होता. स्व.शांताराम ठाकूर यांचा मृत्यू नंतर शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दाखल केल्याने त्यांना या जागेसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.

यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

सर्वसाधारण प्रदीप कुमार कुंदनलाल अग्रवाल, अनुसूचित जाती जमाती रघुनाथ रामभाऊ मोरे, महिला राखीव व सर्वसाधारण तिलोतमा चुडामन पाटील, अनुसूचित जाती जमाती परदेशी राजूसिंग बाबूसिंग, सर्वसाधारण चंद्रकांत भगवानदास शर्मा, प्रदीपकुमार कुंदनलाल अग्रवाल, संभाजी लोटन पाटील, विजाभजा व विमाप्र पाटील रणजीत भिमसिंग, सर्वसाधारण लक्ष्मण पांडुरंग महाजन, मागासवर्गीय लक्ष्मण पांडुरंग महाजन, विजाभजा व विमाप्र मोहन बालाजी सातपुते, सर्वसाधारण लालचंद हेमंत सैनानी, दीपक छबुलाल साळी, इतर मागासवर्गीय पंडित रामचंद्र चौधरी, सर्वसाधारण राकेश गोविंद मुंदडे, प्रवीण रामलाल जैन, अभिषेक विनोद पाटील, लालचंद हेमंत सैनानी, प्रवीण श्रीराम पाटील, भरतकुमार सुरेश लालवानी, पंकज गोविंद मुंदडे, सर्वसाधारण पंकज गोविंद, चंदू जगन्नाथ पाटील, अनुसूचित जाती जमाती रणजित भास्कर शिंदे, महिला राखीव मनीषा विवेकानंद लाठी, वसुंधरा दशरथ लांडगे, अनुसूचित जाती जमाती नरेश दामोदर कांबळे, महिला राखीव मीराबाई रमेश निकम, इतर मागासवर्गीय प्रकाश सदा महाजन, मिलिंद प्रकाश कासार, अनुसूचित जाती जमाती सोमचंद छगन सदानशिव, देविदास लक्ष्मण पाटील यांनी अर्ज दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *