खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर मार्केट कमिटीत सहकार पॅनलचे निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे आणि काँग्रेस पक्षातर्फे सत्कारचे आयोजन करण्यात आले होते. धनदाई माता एज्युकेशन संस्थेच्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार होते. जळगाव जिल्हा ओबीसी अध्यक्ष डी.डी. नाना पाटील हे देखील उपस्थित होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर, महाविकास आघाडीत निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ. अनिल शिंदे, श्री भोजमल पाटील, सुरेश पाटील, डॉ. अशोक पाटील, प्रा. सुभाष पाटील, अशोक आधार पाटील, भाईदास भील, पुष्पा विजय पाटील, समाधान धनगर, सचिन बाळू पाटील यांचा पराभुत उमेदवार व हजर असलेल्या मान्यवरांच्या हस्ते, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सांत्वना प्रित्यर्थ निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, सुरेश विक्रम पाटील, गोकुळ बोरसे, दीपक पाटील व रामकृष्ण पाटील यांचा सत्कार आमदार अनिल दादा पाटील व जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर ज्यांना निवडणूक लढण्याची संधी नाकारली गेली, किंवा तिकीट कापले गेले ते श्री भागवत केशव सूर्यवंशी व श्री प्रताप नगराज पाटील यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. कार्यक्रमात सर्व महाविकास आघाडीचे मार्केट कमिटीचे उमेदवारांची उपस्थिती होती.तसेच रावसाहेब के. डी. पाटील, रोहिदास दाजी, मुन्ना शर्मा, तुषार संदंशिव,प्रवीण जैन, कन्हयालाल कापडे, निळकंठ तात्या, सोमचंद संधान शिव, जुबेर पठाण, सय्यद तेली, सलीम कुरेशी, अमजद पठाण, प्रमोद पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button