खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

महाविकास आघाडीने 11 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवून राखली बाजार समिती

भाजपा प्रणित पॅनलला चारच जागा, दिग्गज उमेदवारांना पराभवाने जोराचा झटका

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करीत आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 11 जागा मिळवून एकहाती सत्ता मिळविली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी 30 रोजी व्यापारी लायब्ररीत झाली. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला सेवा सोसायटी मतदार संघातील सर्वसाधारण मतदार संघाची मोजणी झाली. यात महाविकास आघाडीने 7 पैकी 5 जागा राखून एकतर्फी विजय मिळविला. यात भाजपच्या एकमेव स्मिता वाघ व अपक्ष उमेदवार गडखांब येथील माजी सभापती बापूराव खुशाल पाटील यांचे सुपुत्र नितीन बापूराव पाटील विजयी झाले, तर आघाडी कडून अशोक आधार पाटील, प्रा.सुभाष सुकलाल पाटील, सुरेश पिरन पाटील, भोजमल पाटील, डॉ.अशोक हिंमत पाटील हे विजयी झाले. त्यांनतर महिला मतदार संघात दोन्ही जागा महाविकास आघाडीने राखल्या. यात दहिवद येथील माजी लोकनियुक्त सरपंच सौ.सुषमा वासुदेव देसले व झाडी येथील सौ.पुष्पा विजय पाटील विजयी झाले, इतर मागासवर्गीय मतदार संघात खा.शि.मंडळाचे भावी कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे यांनी माजी संचालक महेश देशमुख यांचा पराभव केला, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात महाविकास प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार तथा निंभोरा येथील सामान्य कार्यकर्ते समाधान धनगर यांनी माजी उपसभापती पद्माकर गोसावी यांचा धक्कादायक पराभव केला. एकंदरीत सोसायटी मतदारसंघाच्या 11 जागेतून 9 जागा महाविकास आघाडीने राखल्याने सोसायटी गटात आमदारांनी आपला करिष्मा दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनतर ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण जागेत माजी संचालक सचिन बाळू पाटील व माजी सभापती प्रफुल्ल पाटील यांचा विजय झाला तर महाविकास मधील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांचा पराभव झाला. आर्थिक दुर्बल मधून भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी महाविकासचे उमेदवार तथा माजी संचालक रामकृष्ण पाटील यांचा पराभव केला, तर अपक्ष उमेदवारी करणारे माजी संचालक अनिल शिसोदे तिसऱ्या स्थानी राहिले. अनु जाती प्रवर्गातुन महाविकासचे भाईदास सोनू भिल यांनी सहकारचे गुलाब आगळे यांचा पराभव केला. आणि सर्वात शेवटी हमाल मापाडी मतदार संघात भाजपा शेतकरी पॅनलचे शरद पांडुरंग पाटील विजयी होऊन त्यांनी अपक्ष उमेदवार रमेश बुधा धनगर यांचा पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर.पाटील यांनी काम पाहिले त्यांना सहा.निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम. जगताप, सुनिल महाजन, सुनिल पाटील, वासुदेव पाटील आदींनी सहकार्य केले. त्यांना सहा.निबंधक किशोर पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. पो.नि.विजय शिंदे मतमोजणी स्थळी ठाण मांडून होते. त्यांना सपोनि राकेशसिंग परदेशी, पो.ना.डॉ.शरद पाटील, रवि पाटील, दीपक माळी व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड पथकाचे सहकार्य लाभले.

14 जागांच्या बहुमताचा दावा

भाजपा प्रणित शेतकरी पॅनलला चारच जागा जिंकता आल्याने त्यांचा पराभव झाला आहे. याआधी बिनविरोध निवडलेले व्यापारी मतदारसंघातील दोन्ही संचालक आधीपासून आमच्या सोबतच असून अपक्ष उमेदवारानेही पाठिंबा दिल्याने आमचे संख्याबळ आता 14 झाल्याचा दावा आमदारांनी केला आहे.

डॉ. अनिल शिंदे यांची ग्रामिण राजकारणात एन्ट्री

या निवडणुकीत पॅनल पराभूत झाले तरी माजी आ.स्मिता वाघ या सोसायटी जनरल गटातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या असून यासोबतच माजी संचालक पराग पाटील, पद्माकर गोसावी, महेश देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला तर माजी सभापती प्रफुल पाटील व माजी संचालक सचिन बाळू पाटील हे पुन्हा विजयी झाले आहेत. डॉ. अनिल शिंदे यांची यानिमित्ताने ग्रामिण राजकारणात एन्ट्री झाली आहे.

दुपारी 3.30 पर्यंत सर्व जागांचे निकाल हाती

एकूण 8 टेबलवर मतमोजणी झाली. त्यासाठी 30 कर्मचारी नियुक्त केले होते, दुपारी 3.30 पर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले. निकाल ऐकण्यासाठी मतदान केंद्रा बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत प्रचंड जल्लोष केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button