अमळनेर (प्रतिनिधी) येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित प्रदर्शन भरवण्यात आले. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध सूत्रे, अवघड गणिते सोप्या करण्याच्या पद्धती, प्रायोगिक व मनोरंजनात्मक पद्धती सादर केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी. पाटील होते. मंचावर संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील, परीक्षक संजय पाटील, डी. ए. धनगर उपस्थित होते. दैनंदिन जीवन जगत असताना आपण गणित विषयाचा वापर व्यवहारात करत असतो. असे संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच धनगर यांनीही विद्यार्थ्यांना गणित विषयासंबंधी मौलिक मार्गदर्शन केले. गणित दिनानिमित्त शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी ५० उपकरणांची मांडणी केली होती. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. व्ही. पाटील, एस. एस. सोनवणे, एन. के. पाटील आदिंनी सहकार्य केले. तसेच प्रा. नयना पाटील, प्रा. वैशाली मोरे, शांतिनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर उपस्थित होत्या. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी पाटील केले भाग्यश्री वानखेडे आभार मानले.
प्रदर्शनात यशस्वी झालेले विद्यार्थी
गणित प्रदर्शनात ५ ते ८वी गटात प्रथम- दिव्यानी नितीन पाटील ( इ.५वी), द्वितीय-भाविका विनोद भोई (इ.६ वी ) तृतीय-उन्नती भगवान पाटील( इ.७वी) तर ८ ते १० वी गटात प्रथम -तन्वी राजेंद्र पवार( इ.८वी). द्वितीय- कावेरी मनोज पाटील (इ.९वी). तृतीय- राज प्रविण पाटील (इ.९वी) यांनी बक्षिसे मिळवली.