खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मैदानी स्पर्धेत सेंट मेरी स्कूलच्या खेळाडूंची राज्य स्तरावर निवड

अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथे दिनांक १५ व १७ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या विभागीय स्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट मेरी स्कूलच्या खेळाडूंनी यश मिळवल्याने त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सी , यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. क्रीडा शिक्षक कमलेश मोरे, किरण शिंपी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी असे

हर्षाली पाटील- थाळी फेक मध्ये द्वितीय, प्रतीक पाटील- गोळा फेक मध्ये प्रथम, ऋतुजा भावसार- थाळीफेकमध्ये तृतीय, दिपक खरवार- हातोडा फेक मध्ये तृतीय या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी सेंट मेरी स्कूलच्या शिक्षकवृंद प्रोत्साहनपर मार्गदर्शन करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button