खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाउंडेशन तर्फे वाडी संस्थान येथील विठुरायाच्या दर्शनासाठी येणार्‍या वारकऱ्यांना फराळाचे केले वाटप

संभाजी ब्रिगेड, राजमुद्रा फाउंडेशन आणि नगरसेवक शाम पाटील यांच्या सहकार्याने राबवला उपक्रम

अमळनेर(प्रतिनिधी) प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेरातील संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थान येथील विठुरायाच्या दर्शनासाठी येणार्‍या वारकऱ्यांना।संभाजी ब्रिगेड – राजमुद्रा फाउंडेशन व नगरसेवक शाम पाटील यांच्या सहकार्याने शहरातील भक्तीशक्ती शिल्प येथे फराळाचे वाटप करण्यात आले.
प्रतिपंढरपूर असलेल्या अमळनेरातील संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थान येथील विठुरायाच्या दर्शनासाठी तालुक्यातील मांडळ, वालखेडा, ढेकू, आर्डी, शिरसाळे , तरवाडे या गावांवरून पायी दिंडीने वारकरी येत असतात. त्यांच्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम पाटील यांनी फराळाची व्यवस्था केलेली होती. यात प्रत्येक वारकरी मंडळीला उपवास चिवडा , राजगिरा लाडू,पाण्याची बॉटल आणि केळी देण्यात आली. यावेळी वारकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांच्या भक्ती शक्ती शिल्पाचे दर्शन घेतले. यावेळी नगरसेवक शाम पाटील तसेच राजमुद्रा फाउंडेशनचे अक्षय चव्हाण , किरण सूर्यवंशी , निनाद शिसोदे , दर्पण वाघ , मयूर पाटील , विशाल पाटील , उज्वल मोरे , तेजस पवार , राहुल पाटील , किशोर पाटील , गौरव पवार , तुषार वायकर , निखिल सूर्यवंशी , भूषण भदाणे , खिलेश पवार , पिंटू जैन व इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button