खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सभासदांच्या ‘विश्वासा’च्या १८१७ मतांनी ‘वसुंधरा’ने सजले ‘खाशि’चे विश्वस्तपद !

सभासदांच्या ‘विश्वासा’च्या १८१७ मतांनी ‘वसुंधरा’ने सजले ‘खाशि’चे विश्वस्तपद !

नगीन लोढा आणि संतोष पाटील यांचा वसुंधरा लांडगेंनी केला दारून पराभव

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त पदाचाही निकाल जाहीर झाला असून गाडा अभ्यास आणि दांडगा अनुभव असलेल्या वसुंधरा लांडगे यांच्यावर १८१७ मतदारांनी विश्वास टाकून विश्वस्तपदी विराजामन केले आहे. सभासदांच्या विश्वासानेच खाशिचे विश्वस्तपदही वसुंधरा लांडगेंच्या कार्यकुशलतेने सजणार आहे. तर नगीन लोढा आणि संतोष पाटील यांना मतदारांनी नाकारले आहे. तर चारही फेरीत ३०३ मते बाद झाली.
खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदानंतर विश्वस्त पदाची मोतमोजणी झाली. एकूण ३७४९ मतांपैकी वसुंधरा लांडगे यांनी १८१७ मते मिळवत विश्वसस्तपदाचा विजयश्री खेचून आणला आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून ते चौथ्या फेरीपर्यंत त्यांनी पावणे पाचशे मतांची आघाडी घेत विरोधकांवर मात केली. त्याच विश्वस्तपदी निवडून येतील, असा विश्वास अनेकांना होता. केवळ मतमोजणीची औपचारिका होती, तीही पूर्ण झाल्याने त्यांच्या विजयावर शिकामोर्तब झाला आहे. तर विरोधकांना एक हजार मतांपर्यंतही पोहचता आले नाही.

कोण आहेत वसुंधरा लांडगे ?

वसुंधरा लांडगे या शिक्षिका आहेत. त्यामुळे शिस्त आणि शिक्षणाच्या त्या महामेरू आहेत. त्या शांत स्वभावाच्या असल्या तरी शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा चांगलाच दबदबा आहे. एक अभ्यासू आणि दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. या आधीही त्या खाशिच्या विश्वस्त पदावर कार्यरत होत्या. म्हणूनच मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा विश्वस्तपदी विराजमान करून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे. ऐवढेच नव्हे तर त्या अर्बन बँकेच्या संचालक आहेत. ग.स.सोसायटीची निवडणूक लढवत आहेत. उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून त्यांचे चांगले नाव आहे. साने गुरूजी वाचनालयासह अनेक संस्थांवर त्यांनी पदे भुषवली आहे. म्हणूनच त्याही सभासदांच्या अपेक्षा खऱ्या ठरवतील, असा सर्वांनाच विश्वास आहे.

विश्वस्त पदाची फेरीनिहाय मतमोजणी अशी

एकूण ३७४९ मतांची मतमोजणी चौथी फेरी ( ७४९ मतमोजणी )
१) वसुंधरा लांडगे – ४७६+४८३+४८४+३७४= १८१७ (विजयी)
२) नगीन लोढा -२३८+२५४+२११+१९७=९००
३) संतोष पाटील -२१०+१८६+२२६+१०७=७२९
बाद मते -७६+७७+७९+७१=३०३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button