खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सुंदरपट्टीचे सरपंच आणि नगांवच्या पोलीस पाटलांनी सामाजिक बांधिलकीतून मैत्रीचा धागा केला घट्ट

स्वतःचा वाढदिवस साजरा न करता कोरोनापासून संरक्षणसाठी गावात वाटल्या आर्सेनिक अल्बम ३० च्या बाटल्या

अमळनेर(प्रतिनिधी) गाव वेगवेगळी असली तरी आपल्या मैत्रीचा धागा अधिक घट्ट करीत सुंदरपट्टी आदर्श गावाचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील आणि  नगांव येथील पोलीस पाटील प्रवीण रामपुरी गोसावी यांनी १ जून रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता कोरोनापासून संरक्षणसाठी आपल्या गावी प्रती कुटुंब एक आर्सेनिक अल्बम 30 मिनी बाॅटल वाटप केले.
दोघांनी आतापर्यंत आपापल्या गावात सॅनिटायझर, मार्क्स, साबण, हॅन्डंवाॅश, धुलीकरण फवारणी करण्याचा ही उपक्रम राबविला आहे. तसेच जनतेच्या आरोग्यासाठी सुरेश पाटील-प्रविण गोसावी या दोघांनी प्रति कुटुंब अर्सेनिक अल्बम नावाचं औषध तहसीलदार मिलिंद वाघ, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील, लोकनियुक्त सरपंच महेश पाटील,लोकनियुक्त सरपंच प्रेरणा बोरसे,आरोग्य सेवक डॉ. खुशाल पाटील डॉ. हिरोळे मॅडम,सुनील अहिरराव,ग्रामसेवक महेंद्र देसले अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर आदींच्या माध्यमातून वाटप केले.

तहसीलदारांच्या हस्ते केले वृक्षारोपण

आदर्श गाव सुंदरपट्टी व नगांव या गावी  तहसीलदार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. या आनोख्या उपक्रमाचे कौतुक दोघांना शुभेच्छा देउन पंचक्रोशीतील ग्रामस्थांन कडून सर्वत्र होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button