खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शिवशक्ती चौक भागात कोरोना रुग्ण सापडूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचा संताप

नगरसेविका कल्पना चौधरी, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी वरिष्ठांना करणार तक्रार

अमळनेर(प्रतिनिधी)शहरातील शिवशक्ती चौक भागात ३७ मे पासून कोरोना रुग्ण सापडून देखील प्रशासनाने कुठलीही विशेष खबरदारी न घेतल्याने नागरिकांमध्ये  संतापाचे व भीतीचे वातावरण पसरले आहे. या सुरू असलेल्या ढिसाळ कारभार विषयी नाराजी व्यक्त करत वरिष्ठांना या बाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे प्रभागाचा नगरसेविका कल्पना चौधरी, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी सांगितले.
ज्या प्रभागात/परिसरात रुग्ण अजूनपर्यंत आढळले नाही तिथे तहसिलदार सोयी पुरवण्याबाबत फोटो टाकून प्रसिद्धी मिळवत आहे. जिथे रुग्ण आढळत आहेत तिथे ढुंकून ही पाहायला तयार नाहीत. तसेच शिवशक्ती चौक मागील भाग (कोष्टी वाडा) परिसरात तर जिथे रुग्ण आढळला आहे तिथे प्रशासनाने फक्त घराचे फोटो काढून नेले. त्या भागाला ना सील केलं ना फवारणी केली. यातून प्रशासन किती गंभीर आहे हे दिसत असल्याचे मत पंकज चौधरी यांनी व्यक्त केले आहे. सुरू असलेल्या ढिसाळ कारभार विषयी नाराजी व्यक्त करत वरिष्ठांना या बाबत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच माजी आमदार शिरिष चौधरी यांनी स्वखर्चाने २ वेळेस निर्जंतुकीकरण फवारणी केल्याने त्यांचे कौतुक केले.

पंकज चौधरी यांनी स्वखर्चाने परिसरात अर्सनीक अल्बम ३० च्या गोळ्या वाटपाला केली सुरुवात

प्रशासनाने शासनाकडून उपलब्ध अर्सनीक अल्बम ३०  गोळ्या देखील वाटण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शेवटी प्रभागाचा नगरसेविका  कल्पना चौधरी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी स्वखर्चाने मंगळवारपासून परिसरात अर्सनीक अल्बम ३० चा गोळ्या वाटपाला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात येत्या दोन दिवसात वाटप करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. यामुळे नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button