खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

पंढरपूर मूक्कामी असलेले प्रसाद महाराजांची दिंडी वारकऱ्यांसह परतीच्या पायी वारीला निघाली

दिनांक २२ डिसेंबरला अमळनेरला होणार आगमन

अमळनेर (प्रतिनिधी) कार्तिक पौर्णीमेला ४ महिन्यांचा चार्तूमास संपल्याने आषाढी एकादशीपासून पंढरपूर मूक्कामी असलेले प्रसाद महाराजांची दिंडीचे दि. १२ रोजी पहाटे ४ वाजता गोपाळपूरा येथे काल्याचे भजन होऊन  वारकऱ्यांसह परतीच्या पायी वारीला निघाले आहे. या वारीचे दि. २२ डिसेंबरला अमळनेरला आगमन होईल.  वारीला २५० वर्षाची अखंडीत परंपरा आहे. तर प्रसाद महाराजांचे हे ३२ वे वर्ष आहे  ८ दिवसाच्या अमळनेर मूक्कामा नंतर त्यांची फिरस्ती सूरू होते .

४२ दिवसांच्या पायी वारीने त्यांचे दि२२ डिसेंबरला अमळनेरला आगमन होईल.  दिंडीचे वेळापूरकडे प्रस्थान  होऊन. पहिला रात्री दिंडीचा  मुक्काम वेळापूर येथे झाला.  येथील ग्रामदैवत असलेल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणारे संत सखाराम महाराज संस्थानचे ११वे गाधीपूरूष संतश्री प्रसाद महाराज यांचे पंढरपूर येथून ४२ दिवसांची पायी वारी सूरू झाली. ही दिंडी भंडी, शेगांव, अकलूज,  बावडा, बाळापूर, वस्ती निमगाव, लसूणे, गूणवडी, बारामती, जळगांव मोरगाव, जेजूरी, सासवड, प्रसंगी, पूणे, लोहगाव, चरोळी मार्गे आळंदी पोहचेल. ३ दिवसाचा आळंदी मूक्कामात आळंदी संजीवन सोहळा दि. २५ नोव्हेंबरला आटोपून ही दिंडी चाकण, भोसे, केंद्र, पाबळ, धामणीपारगांव, कारापूर, जांबूत, चिंचोली, जामगांव, भाळवणी मार्गे अहमदनगरला पोहचेल. या ठिकाणी २ दिवसाच्या मूक्कामा नंतर नांदगाव, राहूरी, गूहा, बेलापूर, आस्तेगांव, राहाता, सावळी, विहिर, कोपरगाव, बेट, पडेगाव, अंदरसूल, नगरसूल, भालूर, मांडवड, नांदगाव, जमदरी मार्गे जळगांव जिल्ह्यातील पिलखोडला पोहचेल.

जळगाव जिल्ह्य़ात अशी येईल वारी

तेथून तिरपूळे, मेहूणबारे कळमळू, तामसवाडी, ऊंदिरखेडे, टोळी, बहादरपुर, फाफोरे मार्गे अमळनेरात २२ डिसेंबरला पोहचेल. दि २३ डिंसेंबरला वेडी आमावस्याला चातूर्मास ऊत्सवाची सांगता होईल.  वेशीवर म्हणजेच फाफोरे रोड वरील खार्टेश्वर मंदिराजवळ मंदिराजवळ त्यांचे स्वागत केले जाते.  यात्रोत्सवानंतर परंपरेनूसार महाराज पंढरपूरला जेष्ठ पौर्णीमेला दिंडी द्वारे रवाना झाले होते. २२दिवसाचे पायी प्रवासानंतर आषाढी एकादशी पासून चार महिने त्यांचा पंढरपूरात मूक्काम होता कार्तिक पौणिमेला १२नोव्हेंबरला त्यांची परतीची पायी वारी  पंढरपूर येथून निघाली  पूणे दौंड मार्गे हि वारी ४२दिवसांच्या पायी प्रवासा नंतर अमळनेरात पोहचते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button