खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

शिरीष दादा म्हणताय, दाखवा रे ती डाक्युमेंट्री ; शाश्वत विकासामुळे होणार पुन्हा जोरदार एन्ट्री

हायटेक प्रचारासाठी ६ एलईडी व्हॅन, एक प्राचर रथ सज्ज

अमळनेर (प्रतिनिधी)- आमदार शिरीष दादा चौधरी यांनी पाच वर्ष काहीच केले नसल्याचा विरोधकांकडून डांगोरा पिटला जात आहे. पण पाच वर्ष त्यांनी गावागावातील कार्यकर्ता जोडून विकास कामे केली आहे. रस्ते व्यायाम शाळा, आरओ फिल्टरचे शुद्धपाणी, सभागृहे व सभामंडपे आदींसह शेकोडे विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे ही सर्व विकास कामे मतदार संघातील नागरिकांना पाहता यावीत म्हणून प्रचारासाठी एलईडी व्हॅन तयार केल्या आहेत. यातून लोकांना शाश्वत विकास कामांची माहिती मिळणार असून विरोधकांचा विश्वास नसेल तर दाखवा रे ती डाक्युमेंट्री, असे सडेतोड उत्तर भाजपाचे उमेदवार आमदार शिरीष दादांनी विरोधकांना देऊन शाश्वत विकासामुळेच पुन्हा जोरदार एन्ट्री करणार असा विश्वास व्यक्त करीत आहेत.
गेल्या पाच वर्षापूर्वी अपक्ष म्हणून निवडून आल्यावरही मतदार संघाचा विकास हाच ध्यास ठेवून शिरीष दादा चौधरी यांनी आपले काम केले. मतदार सघांचा अधिकच विकास व्हावा, येथील तरुणांना रोजगार मिळावा, शेतीशिवार फुलावे यासाठी देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजापाकडून उमेदवारी करीत आहे. यामुळे पुरेपूर सत्तेतस्थान मिळाल्याने विकासाची गती अधिकच वाढवता येणार आहे. त्यामुळे पाच वर्ष आपण काय केले, मतदार संघातील नागरिकांसाठी किती जीवओतून काम केले, याचा लेखाजोखा साऱ्या मतदार संघाला आणि विरोधकांनाही चांगल्याप्रकारे माहिती झाला पाहिजे, यासाठी हायटेक प्रचाराचा शुभारंभ शिरीष दादा यांनी केला आहे. त्यांनी केलेला हा विकास नागरिकांच्या मनात चिरकाल टिकून राहण्यासाठीच प्रचाराची एलईडी व्हॅन तयार केली आहे. लोकसभा निवडणूक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाविरुद्ध प्रचार करताना ”लाव रे तो व्हीडीओ …” हे गाजले होते. तर त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे आशिष शेलार यांनी ”दाखवारे तो व्हिडीओ……” हे अभियान राबवून राज ठाकरे यांना खजील केले होते. तसेच विरोधकांना प्रतिउत्तर देण्यासाठी शिरीष दादा यांनी एलईडी व्हॅन तयार करून विकास कामांची एक डाक्युमेंट्री बनवली आहे.

डाक्युमेंट्रीतून विकास कामांवर टाकलाय प्रकाश

यात खळेश्वर स्मशानभूमी, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाचे काम, भाजीपाला मार्केट, संत सखाराम महाराज भक्त निवास, २८ गावात शुद्ध पाण्याची आरओ प्रणाली, अमळनेर तालुक्यात ३४ग्रामपंचायत इमारती, १०३ सभागृह व सभामंडपे, आदिवासी बांधवांसाठी ४३ गावांमध्ये देवमडी, १२ गावांमध्ये प्रवेशद्वार, सुतगिरणीला मंजुरी, उड्डाणपुलांसाठी निधी, राष्ट्रपरुषांचे पुतळे,३९ गावात व्यायामशाळा, १५० हायमस्ट लॅम्प, हिरा उद्योग समुहाच्या स्वखर्चातून व जलयुक्त शिवार योजनेत ११३ गावांमध्ये नालखीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे व बंधारे, ईदगाह मैदानावर पेव्हर ब्लॉक, सर्वच गावात रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण, विद्यार्थी आणि महिलांना ई-पब द्वारे घरबसल्या रोजगार आदींसह शाश्वत विकाच्या कामांवर प्रकाश टाकला आहे.

हायकेट प्रचाराची गोटच न्यारी.!

पाच वर्षात मतदार संघात करण्यात आलेल्या शाश्वत विकासावर प्रकाश टाकण्यासाठी ६ एलईडी व्हॅन सज्ज केल्या आहेत. एक प्राचर रथ आहे. या व्हॅनमध्ये हायड्रोलिक सिस्टीम आहे. यातून मोठी स्क्रीन करून लोकांना पूर्ण मतदार संघाचा विकास हा आपल्या डोळयात साठवता येणार आहे. त्यामुळे शिरीष दादांचा हा हायटेक प्रचार लोकांना चांगलाच भावत आहेत. आज जो हायटेक विचार करतो तोच मतदार संघाचा हायटेक विकास साधेल, हे आता लोकांना कळू लागले आहे. केंद्र आणि राज्यातील योजनांचा मेळ तेच साधून मतदार संघाच्या विकासाला एक नवी दिशा देत देऊ शकतात, असा विश्वास निर्माण होत आहे. त्यामुळेच या हायटेक व्हॅनचा प्रचार हा नागरिकांसाठी मोठे अप्रुक असून त्याची गोटत न्यारी असल्याने लोक आता या व्हॅन आणि शिरीष दादांचीच चर्चा करू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button