खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

आमदार शिरीष चौधरी यांनी स्मिता वाघांची घेतली भेट, निमंत्रण देत केली गुफ्तगू

अमळनेर (खबरीलाल)आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असतांना आमदार शिरीष चौधरी यांना भाजप कडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा पक्षीय पाठिंबा मिळावा म्हणून आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू रविंद्र चौधरी यांनी आज बुधवारी आमदार स्मिता वाघ आणि त्यांचे पती उदय वाघ यांची भेट घेऊन गुफ्तगू केली. या विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक राहणार असल्याने ४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित रहावे अशी विनंती त्यांना करण्यात आली.

यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील , धनगर दला पाटील,कृ उ बा सभापती प्रफुल पवार, महेंद्र बोरसे,निलेश भांडारकर, शितल देशमुख,जयवंत मंसाराम पाटील,योगराज संदानशिव,पंकज चौधरी, उदय नंदकिशोर पाटील,धनु महाजन, रामकृष्ण पाटील, मिलिंद भाऊसाहेब पाटील,नाटेश्वर पाटील,भाऊसाहेब महाजन,
बंगल्यावर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अनिल पाटलांनी ही घेतली भेट..


अनिल दादा हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे कार्यकर्ते आणि दोनदा उमेदवार ही होते. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी आमदार स्मिता वाघ आणि उदय वाघ यांची भेट घेऊन गुफ्तगू केले आहे. त्यामुळे वाघ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button