खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

दापोरी बु.च्या महिलेने फवारणीचे औषध पिऊन केली आत्महत्या

अमळनेर(प्रतिनिधी) महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील दापोरी बु. येथे घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील दापोरी बु. येथील जनाबाई सखाराम पाटील या महिलेने २० रोजी सकाळी ११ वाजता फवारणीचे औषध घेतले होते. त्यामुळे त्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाल्याने अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभाकर पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button