खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

नाभिक समाजाचे श्रद्धास्थान संत शिरोमणी सेना महाराजांच्या प्रतिमा स्मारकाचे नगराध्यक्षांच्या हस्ते केले थाटात लोकार्पण…

अमळनेर(प्रतिनिधी) येथील नाभिक समाजाचे श्रद्धास्थान असलेले संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमा स्मारकाचे अनावर आणि लोकार्पण लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या वेळी पालखी मिरवणूक काढून भजनाचा आनंद लुटत संत शिरोमणी महाराजांच्या सेवेत तल्लीन झाले. अमळनेर शहर व तालुका नाभिक समाज पंच मंडळ यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्याकडे बांधवगढ (मध्य प्रदेश) जन्मभूमी अन् महाराष्ट्र कर्मभूमी असलेले वारकरी संप्रदायातील थोर संत शिरोमनी सेना महाराज यांचे प्रतिमा स्मारक उभारण्याची विनंती केली होती. त्यांनी या मागणीची दखल घेत त्वरित नगरपरिषद प्रशासनास कार्यवाहीसाठी आदेश केले होते. हे स्मारक पूर्ण झाल्याने मंगळवार दि. 26ऑगस्ट रोजी संत शिरोमनी सेना महाराज पुण्यतिथी पुण्यतिथी निमित्ताने त्याचे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या हस्ते जनतेसाठी अनावर अन् लोकार्पण करण्यात आले. तसेच या वेळी पालखी मिरवणूक व भजनांचा आनंद घेतला. या वेळी नगरसेवक मनोज पाटील, निशांत अग्रवाल, प्रवीण पाठक आदींसह नाभिक समाज बांधव, महिला मोठ्या संखेने उपस्थित होते. स्मारक वेळेत आणि आकर्षित बनवून दिल्याबद्द्ल नाभिक समाजाने नगराध्यक्षांचे मनापासून आभार मानले. नाभिक समाज अध्यक्ष मधुकर सैदाने, सचिव सीताराम बोरसे, जिल्हा पदाधिकारी भारती सोनवणे आदिंसह मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button