खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

आयटीआयचे शिक्षण घेऊन शेतात खत देताना होतकरू विद्यार्थ्याचा भोवळ येऊन दुदैवी मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) आयटीयाचे शिक्षण घेणाऱ्या होतकरू तरुणाचा शेतात खत देताना भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथे रविवारी घडली.
बोदर्डे येथील रहिवासी हर्षल कैलास बोरसे हा तरुण प्रमोद पितांबर पाटील यांच्या कापसाच्या शेतात मजूर म्हणून खत देण्यासाठी गेला होता. या वेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कापसाच्या पिकाला खत देत असताना त्याला भोवळ आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी मयत घोषित केले. त्यानंतर तरुणावर शवविच्छेदन करून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. हर्षल रिक्षाचालक कैलास भाईदास पाटील यांचा मुलगा असून तो सध्या पारोळा येथे द्वितीय वर्ष आयटीआयला शिक्षण घेत होता. एक मुलगा, एक मुले आई वडील असा परिवार आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button