खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅमातून समानता, मानवी मुल्यांवर टाकला प्रकाश

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शना नुसार कला,वाणिज्य व विज्ञान विद्याशाखा मार्फत स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅम राबवला गेला. यात मानवी मूल्ये, समाजभान, स्त्री-पुरुष समानता याविषयावर प्रकाश टाकण्यात आला.
पहिल्या दिवशी आशा फाउंडेशनचे ख्यातनाम व्याख्याते गिरीश कुळकर्णी यांचे मानवी मूल्यांवर व्याख्यान झाले.दुसऱ्या दिवशी प्रथम वर्ष प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे प्रत्येक विभागाला वर्गवारी करुन विभागातील प्राध्यापकांनी महाविद्यालयाची कार्यालय, ग्रंथालय, सी.सी.एम. सी., प्रयोशाळा यांची महत्वपूर्ण ओळख करून दिली. तसेच विभागामार्फत मानवी मूल्ये, समाजभान, स्त्री-पुरुष समानता याविषयावर चर्चासत्रे आयोजित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सदरील कार्यक्र माला  प्राचार्य ज्योती राणे यांनी प्रेरणा दिली व कार्यक्रमांचे नियोजन प्रा. वृषाली वाकडे, प्रा. हेमलता सूर्यवंशी, प्रा. किरण सूर्यवंशी,प्रा. अवित पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button