खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

सालदाराने शेतकऱ्याला सव्वा लाखात फसविले

अमळनेर(प्रतिनिधी) शेतमजुरी साठी नेमलेल्या मध्यप्रदेशातील मजुराने सुमारे सव्वा लाख रुपयात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना १५ रोजी घडली
सचिन रघुनाथ महाजन रा पिंपळे रोड याचे तांबेपुरात शेत असून शेतात काम करण्यासाठी त्यांनी रेमसिंग भिवा सोळंकी रा. सेंधवा याला ५४ हजार रुपयात ठरवण्यात आले होते तो शेतात राहत होता १५ रोजी सकाळी सचिन महाजन शेतात गेले असता रेमसिंग शेतात आढळून आला नाही तो त्याच्या पत्नीसह गायब झाला होता त्याने सचिन ची २० हजर रुपयांची मोटरसायकल क्रमांक एम एच १९ ए.एन.३७०९ तसेच त्यांच्याकडुन घेतलेले ७० हजार रुपये व रोख ३४ हजार रुपये असा एकूण सव्वा लाख रुपयांचा माल लंपास करून फसवणूक केली याबाबत रेमसिंग विरुद्ध भादवी ४२० प्रमाणे फसवणूक चा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोलीस नाईक सुनील हटकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button