खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अमळनेर तालुक्यातील सरपंचाच्या मागणीने व केलेल्या सूचनांचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत..

शासकीय लाभ व वृक्ष संवर्धनासाठी कायदा करण्याची केली मागणी.

अमळनेर(प्रतिनिधी) ऑडीओ ब्रिज च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव, धुळे व बुलढाणा जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांशी संवाद साधला. यावेळी अमळनेर तालुक्यातील मारवड येथील लोक नियुक्त सरपंच उमेश रामकृष्ण साळुंके यांनी
या थेट संवादात एक महत्त्वाची सूचना मांडली ती वृक्ष लागवड आणि जल संधारण याचे महत्व उत्तम प्रकारे सांगितले. शासकीय सेवांचे लाभ व वृक्ष संवर्धनाची सक्ती करण्याचा कायदा करावा अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या मागणीने मुख्यमंत्री चकित झाले. हा विषय सार्वजनिक भान आणि जबाबदारीचा आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सूचनांचे स्वागत करून त्याबद्दल सरपंचांना विचार करू असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक पेज वरून याबद्दलची माहिती दिली.
दरम्यान या संवादातून मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण, चारा छावणी व बोअरवेल तसेच पाण्याचे टँकर आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.
दुष्काळ निवारण्यासाठी राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांशी संवाद अभियान मुख्यामंत्र्याद्वारे सुरु केले आहे.

सौ.प्रेरणा सुशील बोरसे लोकनियुक्त सरपंच नगाव यांचा दुष्काळ निवारण संदर्भात थेट संवाद….

१० मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत फोनवरून दुष्काळ निवारण संदर्भात थेट संवाद साधण्याची संधी सौ.प्रेरणा सुशील बोरसे लोकनियुक्त सरपंच नगाव खु ता. अमळनेर यांना मिळाली.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवादा दरम्यान त्यांना गावासाठी प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना व गावठान योजनेला लवकरात लवकर मंजूरी मिळावी म्हणून विनंती केली.

मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

मुख्यमंत्र्यांनी मागणी केलेली दोन्ही कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी अधिका-यांना आदेश केले. मुख्यमंत्र्यांच्या ह्या थेट संवाद परिषदेत फोनवर जळगाव जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व इतर सर्व प्रशासकीय अधिकारी सहभागी होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button