खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

ग्रीनपीसचा वायू प्रदूषण अहवाल जाहीर, भारतात २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित 

???? झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर

???? मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित

???? भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित

???? झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.

भुवनेश्वर आणि पुरी येथे द्वितीय “BIMSTECआपत्ती व्यवस्थापन सराव-2020” याचे आयोजन

ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर आणि पुरी या शहरांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या द्वितीय “BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव-2020 (BIMSTEC DMEx-2020)” याचे आयोजन करण्यात आले. 11 ऑगस्ट 2020 रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाचा विषय: ‘ए कल्चरल हेरिटेज साइट दॅट सफर्स सेवीयर डॅमेज इन द अर्थक्वेक अँड फील्डिंग ऑर स्टॉर्म’

हा कार्यक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून (NDRF) आयोजित करण्यात आला आहे.

सरावादरम्यान भूकंप आणि पूर परिस्थिती आल्यास कश्या प्रकारे त्याला तोंड द्यावे आणि होणारे नुकसान कमी करण्याविषयी कृती करणे यावर भर दिला जात आहे. वारसा ठिकाणांचा अश्या परिस्थितीत कसा बचाव करावा यावर विशेष भर दिला जात आहे.

BIMSTEC विषयी

बंगालचा उपसागर बहूक्षेत्रीय, तांत्रिक व आर्थिक सहकार्य विषयक पुढाकार (Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technological and Economic Cooperation -BIMSTEC) हा एक प्रादेशिक आर्थिक गट आहे. त्यामध्ये बंगालच्या उपसागरालगत असलेल्या सात देशांचा (बांग्लादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान) समावेश आहे.

BIMSTEC समूह दिनांक 6 जून 1997 रोजी अस्तित्वात आला. त्याचे कायमस्वरूपी सचिवालय ढाका (बांग्लादेश) येथे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button