अमळनेर (प्रतिनिधी) येथील भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत हिंदी दिवस साजरा करण्यात आला. एवढे विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.
सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून प्रार्थना गात संपूर्ण दिवस हिंदीमध्ये बोलण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त हिंदी कथा, कबीर दोहे, देशभक्तीपर गीते, हिंदी मुहावरे, पहेलिया तसेच शिक्षा का महत्व ही नाटीका विद्यार्थ्यांनी सादर केली. मन की भाषा, प्रेम की भाषा हिंदी हे भारत जन की भाषा यावर सविस्तर माहिती हिंदी शिक्षिका विद्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. शनिवारी शाळेचे संपूर्ण कामकाज हिंदी भाषेतून करून सकाळ विभाग प्रमुख विजया गायकवाड, ज्योतिर्मयी सोनवणे, प्रियंका बाविस्कर, दीपाली सोनवणे, राजश्री पाटील, तृप्ती खैरनार, नीता पाटील या शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून हिंदी भाषेविषयी महत्व विशद करून गोडी निर्माण केली.