खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बसस्थानकाजवळ टॅक्सी, अवैध प्रवासी वाहने, रिक्षा आणि फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा विळखा

नगरपालिका आणि पोलीस घेताय बघ्याची भूमिका

 

अमळनेर (प्रतिनिधी) बसस्थानकाजवळ टॅक्सी, अवैध प्रवासी वाहने, रिक्षा आणि फळविक्रेते अतिक्रमण करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच त्यांची अरेरावी ही वाढली आहे. याकडे नगरपालिका आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अमळनेर येथील बसस्थानक परिसरात मंत्री अनिल पाटील यांनी टॅक्सी चालकासाठी स्वतंत्र शेड उभारून सोय केली आहे. मात्र तरीही रस्त्यावर टॅक्सी उभ्या करून टॅक्सीचालक रस्त्यात अतिक्रमण करून अडथळा निर्माण करतात. त्यांच्या बाजूला बेकायदेशीर पणे काही रिक्षाचालक तेथे गर्दी करतात. त्यामुळे बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस आणि प्रवाशी यांना खूप त्रास होतो. त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते आपली खाजगी जागा समजून रस्त्यावर कोठेही उभे राहतात. यामुळे रस्ता रुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते.ही वाहतुकीची कोंडी फोडून पायी चालणाऱ्यांना सर्कस करत रस्ता ओलांडावा लागतो. तर भागवत रस्त्यावर पालिकेने लोखंडी खांब लावून जणू काही अतिक्रमण धारक दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांची सोय केली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याने वाहनचालक मुजोर झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ते जुमानत नाहीत. आपणा इलाका समजून तर सर्वसामान्य नागरिकांवर दादागिरी करतात. वाद भानगडी नको म्हणून सर्वसामान्य नागरिक पुढे येत नाही.  पोलीस अधिकारी अथवा व्हीआयपी व्यक्तीची वाहने गेल्यावर वाहनचालक कसे रस्त्याबर उभे रहातात. त्यामुळे सर्व वॉलपेपर सुरू आहे असा भ्रम यंत्रणेचा झाला आहे. मात्र या अतिक्रमणामुळे सर्वसामान्याचे काय हाल होत आहेत हे यंत्रणेला दिसून येत नाही. यामुळे बसस्थानकाजवळ सिसीटीव्ही कॅमेरे लावून देखील त्यांचा कधीच उपयोग झालेला नाही. हे  कॅमेरे यंत्रणा कधीच पाहत नाही. ते पहिले तर अतिक्रमणाचा विळखा कशा पद्धतीने होतो, हे या कॅमेऱ्यात दिसून येईल व त्यांच्यावर कारवाई करता येईल. त्यामुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यात यावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button