खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात पाच ठिकाणी सीमा केल्या सील, पोलिसांकडून कसून चौकशी

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमळनेर पोलिस आणि प्रशासन सजग झाले असून तालुक्यातील पाच ठिकाणी सीमा बंद केल्या आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची, वाहनाची कसून चौकशी होत आहे. याठिकाणी नावांची नोंद देखील केली जात आहे.
धुळे जिल्हा सीमेवर असलेल्या पाच ठिकाणी सीमा बंदी करण्यात आली असून त्यात पाच गावांचा समावेश आहे. त्याठिकाणी पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत. धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील सीमेवरील चोपडाई, जवखेडा, वालखेडा, ब्राह्मणे नीम या पाच गावांना सीमा बंदी करण्यात आली आहे. २४ तास तपासणी सुरू आहे.  ४ पोलीस तपासणी करत असून त्यासाठी दोन शिफ्ट पोलिसांच्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button